वस्त्रनगरी म्हणून जगभर ख्याती असलेल्या इचलकरंजीत नवनवीन उपक्रम हे राबविले जातातच. आता निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. सभा, दौरे हे उमेदवारांचे सुरु आहेत. आता इचलकरंजीत प्रथमच दिव्यांग केंद्र उभारले जाणार आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच दिव्यांग मतदान केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी पुढाकार घेतला आहे.
या मतदारसंघामध्ये चार नवीन मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. देशभक्त बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली नं. ८ मध्ये असणाऱ्या केंद्र क्र. १३० मध्ये पिंक पोलिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसह सर्व महिलांचा समावेश असणार आहे.
त्याचबरोबर सर्व केंद्रांवर ७ मे रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदान जनजागृतीसाठी १ मे रोजी वेदभवनमध्ये रांगोळी काढण्याचा आणि ७ मे रोजी सायकल रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत मतदारांनी मतदान करावे, या हेतून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे