राज्यात आगामी काही महिन्यांचा विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणूकीत प्रचार तसेच या लढतीकडे मोठं लक्ष लागून राहणार हे नक्की आहे.
राज्यात मागच्या विधानसभा निवडणूकीत मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. परंतु यंदा मनसेकडून संपुर्ण महाराष्ट्रात २०० ते २५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काही मतदारसंघात जाऊन उमेदवारांची घोषणा केली आहे.
यातच ठाकरे घराण्यातील आखणी एक व्यक्ती विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीबाबात मोठं विधान केलं आहे.
अलिकडेच झालेल्या मनसे सरचिटणीसांच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी आपली निवडणूक लढविण्याची इच्छा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली आहे. आता अमित ठाकरे नेमक्या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु त्याआधी ठाकरे घराण्यातील आणखी एक व्यक्ती निवडणूक लढविणार यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे.