मनोज जरांगेच मुख्यमंत्री होणार; CM पदाची चर्चा सुरू असतानाच नव्या दाव्यानं राजकीय ‘वादळ’

मनोज जरांगे पाटलांच वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा देतानाच मनोज जरांगे पाटीलच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.

पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला नाही, तर मराठ्यांचा बालेकिल्ला असल्याचं मतही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केलं. जरांगे पाटील शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर राजगुरुनगर येथे जाहीर सभेतून मराठा समाजाला संबोधित करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असं म्हटलं होतं. पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही लागले होते. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही ही संधी गमावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीत सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुणे जिल्हा पवारांचा बालेकिल्ला नसून मराठ्यांचा आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री हे मनोज जरांगे पाटील असतील असं म्हणत थेट अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. दरम्यान समन्वयकांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.