महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. २८८ जागांसाठी निवडणुका पार पडतील. महाराष्ट्रात 234 जनरल जागा आहेत. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा आहेत.
तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यासाठी राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करतील. त्यासाठी महाराष्ट्रात १ लाख १८६ निवडणूक केंद्र असतील. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत. मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रवर असेल. 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील.
सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे 3 वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल.