चेन्नईनं गुणतालिकेत घेतली मोठी झेप!

आयपीएल मध्ये (IPL 2024) आतापर्यंत 46 मॅच पार पडल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) 78 धावांनी पराभूत केलं. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेटवर 212 धावा केल्या होत्या.

या धावसंख्येचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादचा संघ 134 धावा करु शकला. चेन्नई आणि हैदराबादची मॅच सुरु होण्यापूर्वी हैदराबाद तिसऱ्या स्थानी तर चेन्नई पाचव्या स्थानावर होती. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. यामुळं चेन्नईनं गुणतालिकेत मोठी झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं असून सनरायजर्स हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली.

चेन्नई सुपर किंग्जला प्ले ऑफमधील प्रवेशाच्या दृष्टीनं सन रायजर्स हैदराबादवरील विजय आवश्यक होता. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 212 धावांचा टप्पा गाठला. चेन्नईचा सलामीवीर अजिंक्य रहाणे या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करु शकला नाही.

दुसरीकडे अजिंक्य रहाणे यानं 98 धावांची खेळी केली. तर, डॅरिल मिशेलनं 52 धावांची खेळी केली. यानंतर शिवम दुबेनं 39 धावांची खेळी करत चेन्नईला 212 धावांपर्यंत पोहोचवलं.