पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार…….

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. आज आणि उद्या दोन दिवसात पंतप्रधान मोदींच्या 6 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

29 आणि 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सहा सभांचे आयोजन करण्यात आलं आहे.बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दोन दिवसांतील सभांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे, कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ होणारी सभा दुपारी 3:45 वाजता, पुणे येथील सभा संध्याकाळी 5:45 वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होणार आहे.

ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे. 30 एप्रिल मंगळवारी दुपारी 11:45 वाजता माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी

माळशिरस येथे, दुपारी दीड वाजता धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी, तर दुपारी 3 वाजता लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.