सोलापूर शहरात अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात्त. त्याचप्रमाणे अनेक उपक्रम देखील राबवितात. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला लाभ होतो. सोलापूर शहर बागवान जमियत ट्रस्टच्या वतीने ११ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेबूब दलाल यांनी दिली.
या शिबिरात दातांची, डोळ्यांची व आरोग्याची तपासणी मोफत होणार आहे. यातील गरजूंवर कमी दरात पुढील उपचार करण्यात येणार आहेत. हे शिबिर सर्व समाजांसाठी खुले आहे. हे शिबिर जोडभावी पेठेतील सोलापूर शहर बागवान जमियत हॉल येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेस अल्ताफ लिंबूवाले, नजीम कामतीकर उपस्थित होते.