मोठी बातमी! माढ्यातून मोहिते पाटलांनाच उमेदवारी

माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर मोहित पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघ चर्चेत होता. अद्याप माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी दिल्यानं माढ्यातील मोहिते पाटील नाराज झाले आणि अखेर हीच नाराजी आता बंडखोरीत रुपांतरीत होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अखेर आता धैर्यशील मोहिते पाटील बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्या पक्षात प्रवेश करु शकतात. येत्या 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.