बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे. त्यामुळेच ती नेहमीच चर्चेत राहते. अनेकदा मलायकाच्या आउटफिटची खूप जास्त चर्चा होते. तिचे आऊटफिट अनेकांना प्रचंड आवडतात. तर अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मलायकाचा एक नवीन अवतार लोकांच्य समोर आला असून त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. इतकंच नाही तर तिची तुलना ही उर्फी जावेदशी केली आहे.
मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. मलायकाच्या लूकविषयी बोलायचे झाले तर तिनं एक ब्लू शिमरी ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा लूक खूलुन येण्यासाठी तिनं ईयरिंग आणि शाईनी शू घातले आहेत. मलायकाचा हा ड्रेस ट्रान्सपरेंट आहे. तिच्या या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून अनेकांनी तिची तुलना उर्फीशी केली आहे. ट्रान्सपरेंट ड्रेसमुळे तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
https://www.instagram.com/reel/CylqxXjydHC/?utm_source=ig_web_button_share_sheet
मलायकाची उर्फीशी केली तुलना
नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या कमेंट करत ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला की ‘आत काही परिधान केलं आहे की नाही.’ दुसरा नेटकरी हसण्याचं इमोजी शेअर करत म्हणाला, ‘हा ड्रेस कोणत्या कंपनीनं बनवला आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला ‘उर्फीची बहीण.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘किती विचित्र ड्रेस परिधान केला आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला की ‘म्हातारी झाली तरी असे कपडे परिधान करते.’ तिसरा नेटकरी म्हणाला की ‘उर्फीला तर उगाचच नाव ठेवतात.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सस्ती किम कार्डिशियन.’
मलायकाची केली स्तुती
एकीकडे लोक तिला ट्रोल करत आहेत तर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला ‘या वयात ती इतकी फीट असणं खूप मोठी गोष्ट आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मलायका तिच्या वयापेक्षा तरुण दिसते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘खूप चांगला ड्रेस आहे तुमचा.’