Bigg Boss Marathi : टीम A आणि B मध्ये पडली फूट? अरबाजसोबत अंकितालाही खटकली…..

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम तयार झाल्या आहेत. असं असलं तरी, टीम एमधील निक्की आणि टीम बीमधील अभिजीत सावंत या दोघांची टीम पलिकजे चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. निक्की आणि अभिजीतची मैत्री अरबाजला खटकत असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं, मात्र आता टीम बीमधील सदस्यांनाही या मैत्रीवर आक्षेप असल्याचं दिसत आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे.

बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये  निक्की आणि  अभिजीतची मैत्री हा चर्चेचा विषय ठरणार असून त्याचा प्रोमो समोर आला आहे. अरबाज म्हणतो, “इकडे बोलतो तू सॉरी बोलतो, पण मनापासून बोलत नाही, ती आली तर तो तसं बोलला नाही. उलट बोलतो, ती सॉरी बोलते असं”. यावेळी वैभव म्हणाला की, “मी पण त्याचं मत विचारलं. मी त्याला असं नाही म्हटलं कीपटवून दे कर बाकीच्यांना”. यावर अंकिता अरबाज आणि वैभला म्हणते की, “मला तुझे मुद्दे पटत नाहीत, मी तोंडावर सांगते, तुझे पटत नाहीत, तेही मी तोंडावर सांगते. सूरजला गेम का कळतो माहितंय, एवढ्या सगळ्या आमच्या चर्चेमध्ये सूरज बोलतो, ‘दादा, तू भितोस तिला, हे सूरजचं वाक्य आहे”.