सांगली जिल्ह्यात आजपासून मद्यविक्री राहणार बंद! ७ मे कोरडा दिवस जाहीर

तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे मंगळवारी म्हणजेच ७ मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खुल्या मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आज रविवार दि. ५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यात मद्यविक्री करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने मनाई केली आहे. हा दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर केला आहे. मंगळवार दि. ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होत आहे. रविवारी सायंकाळी पाचपासून मंगळवारी रात्रीपर्यंत मद्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत.

मतमोजणी दि. ४ जून रोजी होत आहे. या काळात मद्य विक्री बंद राहणार असल्याने तळीरामांची मात्र पंचाईत होणार आहे.
निवडणुका शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगली यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत.