Kumbh Mela 2025: कधी आहे कुंभमेळा? शाही स्नानाची तारीख काय? वाचा…

हिंदू धर्मातील लोक महाकुंभमेळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कुंभमेळा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. हा कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा भरतो. आता 2025 मध्ये कुंभमेळा होणार आहे, याआधी 2013 मध्ये महाकुंभमेळा झाला होता.धार्मिक मान्यतेनुसार महाकुंभात शाही स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रांवर कुंभमेळा आयोजित केला जातो. परंतु महाकुंभमेळा केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे आयोजित केला जातो. तब्बल 12 वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जात आहे. 2025 मध्ये महाकुंभमेळा कधी आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात…

महाकुंभमेळा 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून सुरू होणार आहे. तर या कुंभमेळ्याची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी 2013 साली महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. देशभरातील नागा साधू कुंभमेळ्यात पोहोचतात, जे मेळ्याचे खास केंद्रबिंदू आहेत. तसेच या महाकुंभमेळ्यात शाही स्नानाला खास महत्व आहे. या शाही स्नानाच्या तारखा काय आहेत ते जाणून घेऊयात.

2025 च्या कुंभमेळ्यातील शाही स्नानाची तारीख

पौष पौर्णिमा – 13 जानेवारी 2025
मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025
मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025
बसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025
माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025
महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025