पंचगंगा प्रदुषण थांबणार कधी..

इचलकरंजी वासियांना पाण्यासाठी शुद्ध पाणीच नाही .कोल्हापूर जिल्ह्याला पाणी देणाऱ्या पंचगंगा नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. जिल्ह्यातील लाखो लोक या नदीचे पाणी पितात परंतु यावर कोणताही मार्ग निघत नाही. मागच्या कित्येक वर्षांपासून नदी पात्रात गढूळ पाणी सोडलं जात आहे परंतु प्रदुषण नियंत्रण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही.

इचलकरंजी महानगरपालिकेला मागच्या कित्येक वर्षांपासून पंचगंगा नदी पात्रातून दुषीत पाणी पिण्याची वेळ आली आहे. आठवड्यातून दोन वेळा पाणी इचलकरंजी वासियांना मिळते परंतु ते पाणीही दुषीत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून इचलकरंजीला पाण्यासाठी लढा उभारला जात आहे परंतु अद्यापही पाण्यासाठी त्यांची वणवण सुरूच आहे.अनेक वेळा या दुषीत पाण्यामुळे गंभीर आजाराला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.