सैनिकांच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण! पाणी नाही तर मतदान नाही…

 पाणी नाही तर मतदान नाही; सैनिकांच्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण जसा जसा मतदानाचा दिवस जवळ आलेला आहे. तशी सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरस वाढताना पाहायला मिळते. तसेच लोकांचे अनेक गंभीर प्रश्नही आता डोकं वरती  काढताना  पाहायला मिळतायेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला दुष्काळाच्या झळा पोचताना पाहायला मिळतात आणि याच दुष्काळाच्या झळा सत्ताधाऱ्यांसाठी चांगल्याच अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे. आम्हाला पिण्याच पाणी द्या नाहीतर आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये सहभागी होण्याचं परवानगी द्या अशी मागणी काही दिवसांपूर्वी 65 गावांनी  केलेली होती. या 65 गावांनी पुन्हा एकदा आता हाच विषय समोर आणताना पाहायला मिळतोय.

त्यामुळे ऐन निवडणुकीत उमेदवारांची अडचण ठरण्याची शक्यता आहे.   राज्यात महायुती आणि  महाविकास आघाडी असली तरी सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र वेगळा पॅटर्न राबवताना पाहायला मिळतोय. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या बाजूने अनेक राजकीय नेते उभे राहताना पाहायला मिळत आहे. सांगलीत मिरज पॅटर्न नव्याने तयार होताना पाहायला मिळतो.  सर्वपक्षीय नगरसेवकांनी भूमिका घेऊन विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात केल्याची माहिती समोर येते. काय आहे मिरज पॅटर्न आणि कोणकोणत्या पपक्षाच्या नेत्यांचा पाठींबा आहे.