शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी म्हणजेच दिनांक २१ मार्च ला मिरज दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर विमानतळावरून ते पुढे सांगलीकडे मोटारीने जाणार आहेत.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवाराबाबत ते दौऱ्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागा कॉंग्रेसकडे दिली जाणार आहे.
त्या बदल्यात सांगलीतील जागा शिवसेनेला असणार आहे. उद्धव ठाकरे हे सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यात दोन्ही उमेदवारांबाबत स्वतः निर्णय जाहीर करतील, असेही जिल्हा संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी सांगितले.
