वैभव सूर्यवंशीच्या तुफानी शतकाची दखल आता रोहित शर्मालाही घ्यावी लागली होती. वैभवने शतक झळकावले आणि त्यानंतर काही वेळातच रोहितने वैभवसाठी एक खास पोस्ट केली. पण या पोस्टमध्ये रोहितने फक्त एकच असा शब्द वापरला जो वैभवसाठी योग्य ठरतो. रोहित शर्माने हा एकच शब्द वापरत वैभवचे कौतुक केले आणि त्याने सर्वांची मनं जिंकून घेतली.
वैभवने या सामन्यात आयपीएलमधील सर्वात जलद शतक झळकावले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शतक करताना त्याने ११ षटकार मारले, आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला एका डावात ११ षटकार मारता आलेले नाहीत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेहमीच युवा खेळाडूंचे कौतुक करत असतो. त्यामुळे वैभवच्या दमदार शतकानंतर रोहित शर्माने एक खास पोस्ट लिहिली. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे.
रोहित शर्माने (Rohit Sharma) ही पोस्ट लिहिताना वैभवच्या शतकाचा एक सुंदर फोटो वापरला आहे. रोहितने यावेळी फक्त एकच शब्द वापरून वैभवचे कौतुक केले आहे, रोहितने यावेळी वैभवची फलंदाजी पाहून क्लास… हा एकच शब्द वापरला आहे आणि एक इमोजी त्याने त्यापुढे लावली आहे. हा संदेश त्याने वैभव सूर्यवंशीला इन्स्टाग्रामवर टॅग केला आहे. त्यामुळे रोहित शर्माची ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे आणि चांगलीच व्हायरल झाली आहे. रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून ओळखला जातो, पण या सामन्यात वैभव हिटमॅन ठरला आणि त्याचे कौतुक करायला यावेळी रोहित शर्माही विसरला नाही.