निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला बसणार झळ……

सध्या देशात लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) होत आहे. 4 जून 2024 रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज (Mobile Recharge) महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2021 नंतर टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनमध्ये वाढ केलेली नाही. मात्र निवडणूक संपताच या मोबाईलच्या डेटा पॅकमध्ये साधारण 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बीओएफए सेक्युरिटीज (Bofa Securities ) ने नुकतेच देशातील टेलिकॉम क्षेत्रावर आधारित एक रिसर्च पेपर जारी केला आहे.

या रिसर्च रिपोर्टमध्ये आगामीक काळात टेलिकॉम सेक्टरमध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडणार आहेत. लवकरच 20 ते 25 टक्के मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता आहे. याआधी या बीओएएफ सेक्युरिटीजने मोबाईल डेटा पॅक 10 ते 15 टक्के महागण्याची शक्यता व्यक्त केली होती. डेटा पॅक वाढवून टेलिकॉम कंपन्या फायबर ब्रॉडबँड, एंटराप्रयजेस, डेटा सेंटर ऑफरिंग यांच्यात गुंतवणूक करू शकतात. लवकरच रिलायन्स इंडस्ट्रिजची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी जिओचा आयपीओ ( REliance Jio IPO) येण्याची शक्यता आहे. यामुळेदेखील टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.आगामी काळात मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता बीओएएफने व्यक्त केली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी डेटा आपापल्या डेटा पॅकमध्ये वाढ केली होती. तसाच प्रकार निवडणुकीनंतर घडण्याची शक्यता बीओएएफने व्यक्त केली आहे. ग्राहकांना 20 ते 25 टक्क टेरिफ प्लॅन्समध्ये वाढीची झळ बसू शकते. 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर टेरिफ प्लॅन्सवर निर्णय होण्याची शक्यता आहे. बीओएएफ ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार डेटा पॅक एकदा महागल्यानंतर हळूहळू ग्राहकांना त्याची सवय होते.

टेलिकॉम कंपन्यांनी 5जी (5G) सेवा देण्यासाठी मोठा खर्च केलेला आहे. काही कंपन्या आजही ट्रायल बेसेसवर मोफत 5 जी डेटा देतात. हाच खर्च वसूल करण्यासाठी कंपन्या आगामी काळात टेरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लवकरच सामान्यांच्या खिशाल मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.