सनरायजर्स हैदराबादनं लखनौ सुपर जाएंटसवर 10 विकेट आणि 52 बॉल राखून विजय मिळवला. या विजयाचा थेट फटका मुंबई इंडियन्सला बसला. गुणतालिकेत नवव्या स्थानावर असणारी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या शर्यतीबाहेर गेली. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये टीमचं नेतृत्त्व रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याकडे दिलं होतं. हार्दिक पांड्यानं गुजरातला एकदा विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळवून दिलंहोतं.
हार्दिकनं 11 डावात 198 धावा केल्या. तर 10.58 च्या इकोनॉमीनं 11 विकेट घेतल्या.रोहित शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये 12 डावात 330 धावा केल्य आहेत. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. मात्र, गेल्या पाच मॅचमध्ये त्याला दोन आकडी धावसंख्या देखील गाठता आलेली नाही. सूर्यकुमार यादवनं दुखापतीमुळं उशिराच मुंबई इडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली. त्यानं 9 मॅचमध्ये 1 शतक आणि तीन अर्धशतकांच्या जोरावर 334 धावा केल्या.तिलक वर्मानं देखील चांगली कामगिरी केली असून त्यानं 384 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं तीन अर्धशतकं झळकवली आहेत.
जसप्रीत बुमराह 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबई इडियन्ससोबत दुखापतीमुळं खेळू शकला नव्हता. यंदा त्यानं कमबॅक केलं असून त्यानं 12 मॅचमध्ये 18 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत 12 मॅच खेळल्या असून त्यामध्ये त्यांचा 8 मॅचमध्ये पराभव झाला. चार मॅचमधील विजयासह मुंबई 8 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. हैदराबादच्या विजयानंतर मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही हे स्पष्ट झालं.