IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे?

रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी विजय मिळवल्यानंतर प्लेऑफ शर्यतीला रोमांचक वळण मिळाले आहे. 62 सामन्यांनंतर आतापर्यंत केवळ एकाच संघाला प्लेऑफचे तिकीट मिळू शकले आहे.अशा स्थितीत उर्वरित तीन जागांसाठी सात संघांमध्ये लढत सुरू आहे.

12 मे रोजी आरसीबीने दिल्लीविरुद्ध विजय मिळवून त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की सीएसके आणि आरसीबी दोघेही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात का?

तर आरसीबी सध्या 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. 18 मे रोजी शेवटच्या साखळी सामन्यात आरसीबीचा सामना सीएसकेशी होणार आहे. डुप्लेसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला हरवले तर त्यांचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला करावा लागेल.याशिवाय बेंगळुरूला सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या सामन्यांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

जर केएल राहुलच्या संघाने दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकला आणि दिल्ली-गुजरातचा नेट रन रेट खराब राहिला, तर शनिवारी आरसीबी-चेन्नई यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळेल.चेन्नई 13 सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. संघाच्या खात्यात 14 गुण आहेत.

चेन्नईला शेवटचा सामना बेंगळुरूविरुद्ध खेळायचा आहे. गायकवाड यांच्या संघाने हा सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर सामना हरल्यास त्यांना नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

आरसीबीने त्यांच्या पुढील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला थोड्या फरकाने पराभूत केले तर त्यांचे 14 गुण होतील. या स्थितीत चेन्नईच्या नेट रन रेटवर फारसा परिणाम होणार नाही.त्यात 14 मे रोजी लखनौचा सामना दिल्लीशी तर 17 मे रोजी मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आणि या दोन सामन्यांत लखनौने फक्त एकच जिंकला तर त्याचे 14 गुण होतील.

यासोबत हैदराबादला आपले दोन्ही सामने गमवावे लागणार आहेत. या स्थितीत तो केवळ 14 गुणांवर राहिल.आणि चांगल्या नेट रनरेटसह आरसीबी आणि चेन्नई 14 गुण मिळवत टॉप-4 मध्ये जातील. त्याच वेळी, लखनौ आणि हैदराबादचे प्रत्येकी 14 गुण असतील, परंतु त्यांचा नेट रन रेट चेन्नई आणि बेंगळुरूच्या तुलनेत जास्त नसेल.