M. S. Dhoni Birthday: वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एमएस धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव!

आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)याचा 43 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एमएस धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.बॉलिवूड अभिनेता सलमान खानने महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

माहीसोबतचा एक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.धोनी आणि पत्नी साक्षी हिचा वाढदिवसानिमित्त केक कापतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. धोनी केक कापत असताना साक्षी त्याच्या बाजूला उभी आहे. यानंतर तिने धोनीला केक भरवला.

यावेळी सलमान खान देखील उपस्थित होता.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही माहीची क्रेझ कमी झालेली नाही. चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरला त्याच्या वाढदिवसानिमित्त आपापल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्याच्या चाहत्यांच्या यादीत त्याची पत्नी साक्षीचे नाव अग्रस्थानी आहे.

साक्षीने पती महेंद्रसिंग धोनीला त्याच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त स्पेशल केक दिला. महेंद्रसिंग धोनीने पहिला केक कापला तेव्हा सलमान खानने साक्षी धोनीला आधी तो खायला सांगितला.

यानंतर माहीने भाईजानचे तोंड गोड केले. याशिवाय माहीच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटी दिसले. मात्र, सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.