खानापूरात आजपासून स्पर्धा महोत्सव

सुलतानगादे (ता. खानापूर) येथील कर्मवीर मोफत वाचनालय व शंतनू पाटील स्मृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने शुक्रवार, दि. १० मेपासून १२ मेपर्यंत स्पर्धा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये वक्तृत्व, निबंध व
रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले असून, लहान, मोठ्या व खुल्या अशा विविध गटांमध्ये या स्पर्धांचे होणार आहेत. या स्पर्धेसाठी बक्षिसे असून, खानापूर घाटमाथ्यावरील विद्यार्थ्यांनी या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. पाटील व संयोजक किशोर पाटील यांनी केले आहे.