खानापूरमध्ये दत्तजयंती सोहळा….

खानापूर येथील दत्तनगरमधील दत्त मंदिरामध्ये शनिवार, १४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्त मंदिरात अनेक वर्षांपासून जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मंदिरामध्ये दुपारी चार वाजता भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता महाआरती होणार आहे. त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी खानापूर परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माने (माळी) परिवाराने केले आहे.