लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष हा व्यस्त आहे. अनेक आमदार खासदार हे एकमेकांवर नाराज देखील झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे.
तर आटपाडी तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास अतिशय समृद्ध होता. राजकारण असले तरी टोकाचा संघर्ष कधीच नव्हता. मात्र, आता येथील राजकारण विचित्र होऊ लागले आहे. मलाही ते पसंत नाही.राजकारणापुरता संघर्ष ठीक, पण वैयक्तिक संघर्ष मला मान्य नाही अशी नाराजी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी भरकार्यक्रमात केली.
अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आमदार बाबर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील एका व्यासपीठावर आले होते. आटपाडी येथे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार बाबर यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली.