झोपलेल्या मुलाला कशाला उठवता,’ असे पत्नीने पतीला म्हटल्याच्या कारणावरून पतीने मुलगा व पत्नीवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना भाळवणी (ता.खानापूर) येथे नमाजटेक परिसरात घडली. शुभम लक्ष्मण मुजमुले (वय १७), सुदामती लक्ष्मण मुजमुले (४०) अशी जखमींची, तर संशयित लक्ष्मण अर्जुन मुजमुले (४५, मूळ पुसरा, ता. वडवणी, जि. बीड; सध्या भाळवणी, ता. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत.
शुभम मुजमुले याने विटा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी संशयितास अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यास दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले. भाळवणी येथे बीड जिल्ह्यातील पुसरा येथील मुजमुले कुटुंब ऊसतोडणीसाठी आले आहे. संशयित लक्ष्मण हा झोपलेला त्याचा मुलगा शुभम यास उठवत असताना पत्नी सुदामती हिने लक्ष्मण यास, ‘शुभम दिवसभर काम करून कंटाळला आहे. त्यास उठवू नका,’ असे म्हटल्याचा राग मनात धरून पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. हातातील चाकूने तिच्या पोटावर डाव्या बाजूस वार केला. आईला वाचवण्यासाठी मुलगा शुभम गेल्यानंतर त्याच्या अवघड जागेवर मारून गंभीर जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संशयित लक्ष्मण यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.