‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अर्थात ‘बिग बॉस’च्या माध्यमातून दरवर्षी कोणी ना कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टार होतो. ‘बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16) अब्दु रोझिक झळकला होता. बिग बॉसच्या माध्यमातून अब्दु भारतात चांगलाच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात अनेकदा त्याने प्रेम आणि एकटेपणाबद्दल भाष्य केलं आहे. अब्दुची उंची 3 फुट असल्याने एकही मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यात तयार नव्हती. पण अब्दुच्या आयुष्यात आता एका मुलीची एन्ट्री झाली आहे. अब्दु लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अब्दु रोझिकने 9 मे 2024 रोजी इंस्टाग्रामवर एक घोषणा केली होती. 7 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर 10 मे 2024 त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे.