कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, असंच काहीसे या व्यक्तीसोबत घडलं. अंतराळातून त्याच्या छतावर एक रहस्यमय गोष्ट पडली, ज्यानंतर तो कोट्यधीश झाला आहे. पहिले तर त्याला ही गोष्ट काय आहे ते समजलेच नाही. पण, जेव्हा त्याला या गोष्टीची खरी ओळख पटली तेव्हा त्याला धक्काच बसला. जोशुआ हुतागालुंग असे या व्यक्तीचे नाव आहे. तो इंडोनेशियातील कोलांगचा रहिवासी आहे. त्याच्या घरावर अंतराळातून एक दगड पडला होता.
हुतागालुंग हे घराबाहेर काम करत असताना त्याच्या व्हरांड्यात एक उल्का येऊन पडली. ही उल्का त्याच्या लिव्हिंग रुमजवळ पडली होती. ती इतक्या वेगाने पडली की जमिनीवर १५ सेमीचा खड्डा तयार झाला. या उल्केची तपासणी केली असता ती उल्का ४.५ अब्ज वर्षे जुनी असल्याचं आढळून आले. त्याचे वजन २.१ किलो होते. तर त्याची किंमत सुमारे १४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही उल्का अत्यंत दुर्मिळ CM1/2 कार्बोनेशियस कॉन्ड्राईट असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे विशेष प्रकारचे उल्का आहेत.
एका तज्ज्ञाने हुतागालुंगकडून ते उल्का विकत घेतले आहे. तसेच, त्याच्या ३० वर्षांच्या पगाराएवढी किंमतही त्याला दिली आहे. कोट्यधीश झाल्यानंतर हुतागालुंगने सांगितले की, या पैशातून तो आपल्या समाजात एक चर्च बांधणार आहे. त्याच्या घराजवळच उल्कापिंडाचे आणखी तीन तुकडे सापडले आहेत. ही उल्का खरेदी केल्यानंतर इंडियानापोलिसच्या तज्ज्ञाने ती अमेरिकेला पाठवली आहे.
अमेरिकन उल्का तज्ज्ञ जेरेड कॉलिन्स यांनी त्याचा एक भाग विकत घेतला आहे. ते म्हणाले की त्यांचा फोन अशा ऑफर्सने भरलेला आहे. ज्यामध्ये लोकांनी त्यांना उल्का खरेदी करण्यासाठी विचारलं आहे. ते म्हणाले की हा करोना विषाणू महामारीचा काळ होता. मग ते संभ्रमात पडले की अमेरिकेत शास्त्रज्ञ आणि संग्राहकांसोबत काम करायचं की स्वतःसाठी उल्का विकत घ्यायच्या. यानंतर त्यांनी जमेल तेवढे पैसे गोळा केले. मग, त्यांना जोशुआ हुतागालुंग सापडले आणि त्यांनी उल्का विकत घेतली.