भारत – इंग्लंड सीरिजच्या पहिल्या सामन्यात झाला मोठा ब्लंडर

भारत विरुद्ध इंग्लंड (India-England) यांच्यातील महिला संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात आहे. शनिवार 28 जून रोजी भारत – इंग्लंड यांच्यात टी 20 सीरिजमधील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 97 धावांनी पराभव केला. यात भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानानं शतक ठोकलं. या विजयासह भारतीय संघाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.

पहिल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने इंग्लंडच्या महिला संघावर कारवाई केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली, ज्यामुळे संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आयसीसी आंतरराष्ट्रीय मॅच रेफरी पॅनलच्या हेलेन पॅकने हा दंड लगावला. मैदानी अंपायर जॅकलीन विलियम्स आणि जेम्स मिडलब्रुक, तिसरा अंपायर सू रेडफर्न आणि चौथा अंपायर अन्ना हॅरिसने या आरोपांची पुष्टी केली. इंग्लंडची कर्णधार नॅट साइवर ब्रंटने त्यांची चूक आणि प्रस्तावित दंड स्वीकारला, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, जो किमान ओव्हर रेटशी संबंधित आहे, खेळाडूंना त्यांच्या संघाने दिलेल्या वेळेत न टाकलेल्या प्रत्येक ओव्हरसाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो.