Mothers day 2024 : मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी ही कविता आपण सर्वांनी ऐकली असेल. या जगात आपण सर्वांचे उपकार फेडू शकतो पण आईचे उपकार फेडू शकत नाही. अनेक लेखक, कवी यांनी आईच्या महात्म्याविषयी आपल्या कवितेत, लिखाणात सांगितलंय.

आज आई उद्धार करणारा दिवस म्हणजे मदर्स डे साजरा केला जाणार आहे.रविवारी मातृदिन साजरा करण्यामागचा एक उद्देश असा आहे की या दिवशी प्रत्येकाला सुट्टी असते. यामुळे प्रत्येकजण आपल्या आईला पूर्ण वेळ देऊ शकेल.

प्रत्येकजण आपापल्या परीने हा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट सामान्य आहे की, या दिवशी प्रत्येकजण आपल्या आईला एक खास भेटवस्तू देत असतो.

आईचा सहवास नेहमी हवा

दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास… ती म्हणजे आई.

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला. मातृदिन शुभेच्छा