महिला विकासासाठी सरकार अनेक प्रोत्साहनपर योजना राबवीत असते. महिलांना व्यावसायिकदृष्ट्या प्रोत्साहित करण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष विभाग कडून राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून विशेष कर्ज दिले जाते ज्यामुळे महिलांना आर्थिक बळकटी चांगली प्राप्त होते.
या योजनेद्वारे महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाखापर्यंत कर्ज तात्काळ दिले जाते यासाठी कर्जाचा व्याजदर हा चार टक्के इतका आहे. आणि ही रक्कम महिलांना साधारणपणे तीन वर्षात परतफेड करावयाचे आहे या योजनेचा हेतू बचत गटांमार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे हा आहे.
या योजनेमध्ये महिलांना 95 टक्के कर्ज हे राष्ट्रीय महामंडळाकडून व पाच टक्के कर्ज हे राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते यामुळे लाभार्थ्यांचा सहभाग शून्य टक्के असतो. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटाच्या कोणत्याही सदस्या म्हणजेच महिला पात्र राहतील.
पात्रता :
यासाठी लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे. त्याचे रेशन कार्ड बीपीएल दारिद्र्यरेषेखालील असावे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा असू नये. तसेच लाभार्थी महिलेचे वय हे 18 ते 50 या दरम्यान असावे. आणि या महिला लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार तर शहरी भागासाठी दोन लाखापर्यंत असावे. बचत गटाची स्थापना होऊन किमान दोन वर्षाची कालावधी पूर्ण झालेला असावा.
अटी व शर्ती :
महिला लाभार्थ्याला या कर्ज योजनेअंतर्गत 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व पाच टक्के कर्ज हे राज्य महामंडळाकडून उपलब्ध केले जाते परंतु काही वेळेस राज्य महामंडळाकडून कर्ज उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेला स्वतःकडे पाच टक्के रक्कम भरावी लागते. जावळी कर्ज उपलब्ध होईल त्यावेळी कर्ज मिळाल्यापासून चार महिन्याच्या आत कर्जाचा उपयोग करून जो उद्योग उभारला आहे तो दाखविणे बंधनकारक आहे.
अर्जदार हा कुठल्याही बँकेच्या किंवा पतसंस्थेच्या संस्थेचा थकवाकीदार नसावा. ज्या बचत गटाद्वारे हे कर्ज आपण घेत आहात त्या बचत गटाची हे प्रत्येक महिन्याला मासिक बैठक व तारखेच्या तारखेला पैसे भरणे आवश्यक आहे.बचत गटाची खाते हे रात्री खूप शेड्युल बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक यामध्ये असेल त्या स्वच्छ घटना या योजनेचा लाभ घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे :
जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, बचत गटाचा मेंबरशिप आयडी कार्ड, विज बिल किंवा रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत.
अर्ज कसा करावा;
या योजनेसाठी आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असलेली सर्व माहिती सविस्तर वरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज तेथे जमा करावयाचा आहे अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पोचपावती घ्यायची आहे.
याशिवाय या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात संपर्क साधू शकता.
यासंदर्भात थेट जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. वरील माहिती विविध माध्यमांतून एकत्रित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीची खात्री करून तसेच माहिती मध्ये काही बदल झाले असल्यास त्याची नव्याने माहिती घेऊन अर्ज सादर करावेत.