इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.यानंतर केकेआरने निर्धारित १६ षटकात ७ बाद १५७ धावा केल्या. पावसामुळे सामना २ तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला त्यामुळे सामना १६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्युत्तरात मुंबईला ८ विकेट्सवर केवळ १३९ धावा करता आल्या. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले. चालू मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने एके काळी ५ षटकांत एकही विकेट न गमावता ५९ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी धावांचा वेग रोखून नियमित अंतराने विकेट्स घेतल्या.
मुंबईकडून इशान किशनने २२ चेंडूत ४० धावा केल्या. तर तिलक वर्माने १७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. बाकीचे सर्व फलंदाज रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड सुपर फ्लॉप ठरले.