विश्वजीत कदमांच संभ्रमात टाकणार वक्तव्य……

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वजित कदम यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रचारात विश्वजित कदम आधी सक्रिय नव्हते. मात्र दिल्लीवरुन आदेश आल्यानंतर विश्वजीत कदमांनी प्रचारात उडी घेतली. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला.

आता मतदानानंतर एका कार्यक्रमात विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारणात तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मोठा कलगीतुरा रंगला होता. चर्चेअंती ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे मविआकडून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विश्वजीत कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतलाअसला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे. अशातच विश्वजीत कदम यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली आहे.