पलूस कडेगावचे अष्टपैलू नेतृत्व म्हणजेच मा. आमदार विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम

आज पलूस कडेगाव चे अष्टपैलू नेतृत्व असलेले मा. आमदार विश्वजीत कदम यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. एक विनम्र व निगर्वी व्यक्तिमत्व म्हणून विश्वजीत कदम यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या मातापित्यांकडून राजकारण, समाजकारण व शिक्षणाचे बाळकडू घेतलेले आहे.

स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा तितक्यात जोशात यांनी पुढील नेण्याचे काम करून आपल्यावरील जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत. पलूस कडेगाव मतदार संघाबाहेर जिल्ह्यातील व राज्यातील युवकांचे व शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत.

सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. दुष्काळ, महापूर, भूकंप, अतिवृष्टी यामुळे हतबल झालेल्या गरीब लोकांना मदतीचा आधार देऊन लोकांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केलेले आहे.