सांगलीसह जिह्यातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस

सांगली शहरासह जिह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव, कडेगाव, विटा, मिरज आणि पलूस तालुक्यांतील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने बत्ती गुल झाली होती. दरम्यान, जोरदार पावसाने उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र होते.

सांगली शहर परिसरातील मिरज रोडवरील विजयनगर परिसरात गारांचा पाऊस झाला. मिरज तालुक्यातील दूधगाव, कवठेपिरान, समडोळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील चिंचणी, मांजर्डे, हातनूर, मणेराजुरी, तर विटय़ातील कार्वेसह परिसरात जोरदार पाऊस झाला.