घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

घाटकोपर पूर्व येथे महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक पाच लाख रुपयांची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

घाटकोपर अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आतापर्यंत ३५ लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. होर्डिंग पडल्याप्रकरणी जे दोषी आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले. तसेच शहरातील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.