भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) राजकारणात प्रवेश केला आहे. रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. रिवाबाने नुकतीच रवींद्र जडेजाबद्दलची ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
टी-20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर रवींद्र जडेजाने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. गुजरातमधील निवडणुकीच्या काळात रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत अनेकदा प्रचार दिसून आला. निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला. आता रवींद्र जडेजा भाजपचे सदस्य देखील झाला आहे. रिवाबा जडेजाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान टी-20 विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली होती.