इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून घेतले नमुने

इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस खूपच वेगळे वळण घेत आहे. पंचगंगा प्रदूषण तसेच अपुरा पाणीपुरवठा यामुळे शहर वासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचलकरंजीतील काळ्या ओढ्याचीही सायंकाळी प्रजासत्ताक सामाजिक संस्था व प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त पाहणी केली. काळ्या ओढ्यासह दोन ठिकाणचे पाण्याने नमुने घेतले. या ओढ्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या, पण सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत.

तिथे पाणी निर्जंतुकीकरणासाठी बंधारा बांधला आहे. त्याची पाहणी करून बंधाऱ्यातील सांडपाण्याचे नमुने घेतले. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. यावेळी देसाई यांच्याबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते संतोष हत्तीकर उपस्थित होते.