आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Arrival Update) तारीख समोर आली आहे. उन्हाच्या कडाक्या हैराण झालेल्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.नैऋत्य मान्सून यंदा काही दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.