ठाण्याच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा विरारमध्ये संशयास्पद मृत्यू!

 विरारमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉट मध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह आले होते. रिसॉर्टच्या गेटमधून गाडी नेताना एका रिक्षाचा धक्का लागून, त्यांची स्थानिकांसोबत भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनांही मारहाण झाली होती. आणि त्यानंतर मिलिंदला चक्कर आल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

दरम्यान, हाणामारी आणि मिलिंद कोसळल्याची घटना रिसॅार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. विरारच्या अर्नाळा येथील सेवन सी रिसॉर्टमधील कर्मचारी आणि रिक्षाचालकांच्या मारामारीत ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे याचं मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. हाणामारीची आणि हृदयविकाराचा झटका आल्याची संपूर्ण घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. 

रिसॉर्ट समोरील रिक्षा बाजूला करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादित चक्क ठाण्याच्या या फॅमिलिला 10 ते 15 जनांनी बेदम मारहाण केली आहे. यात महिलांना ही मारहाण करण्यात आली आहे. यात मिलिंदचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे, तर दोनजण यात गंभीर जखमी झाले आहेत. मृत मिलिंद मोरे ठाण्यात शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा आहे. 

विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये काल रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. रविवारची पिकनिक बनविण्यासाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील 15 ते 20 जणांसोबत विरारच्या अर्नाळा सेवन सी रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आले होते. दिवसभर मज्जा, मस्ती करुन घरी परतत असताना रिसॉटच्या गेटमध्ये एका रिक्षाचा धक्का लागून त्यांची  भांडणं झाली होती. यात मिलिंदला आणि इतर दोघांनाही मारहाण झाली होती. यात बातचीत सुरु असताना मिलिंद अचानक चक्कर येवून कोसळला, त्याला तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. 

विरारमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन झालं आहे. जमावानं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांची पोलीस उपायुक्तांशी फोनद्वारे चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून संबधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्या भारतीय दंड संहिता 2023 ते कलम 105, 281, 74, 188(1) (2), 191(2), 118(2),  352, 351 (2) प्रमाणे  अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात अद्याप कुणालाही  अटक करण्यात आली नाही.