सुळकूड योजनेचा अहवाल २५ मे पर्यंत सादर करणार

सुळकूड योजनेतून इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणे शक्य आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल येत्या २५ मेपर्यंत शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बैठक घेऊन १ महिन्यात पाणी प्रश्न निकालात काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला अडीच महिने झाल्यानंतरही याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने माजी खासदार शेट्टी यांनी याप्रश्नी जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.