आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. कोणत्याही वेळेस आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे सर्वत्र नेते मंडळींची धावपळ सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने मोर्चे बांधनीला वेग दिलेला आहे. अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत नवखा उमेदवार असताना देखील महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांनी प्रचारासाठी अल्प वेळ असताना देखील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात चांगली मते घेतलेली आहेत. विधानसभेलाही आघाडीतील सर्व घटक पक्ष एकसंघ आहेत. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन अटळ आहे असा दावा मँचेस्टर आघाडीचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केला आहे.
Related Posts
एसटीतून महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने लंपास!
इचलकरंजी – वाठार एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचे ६ तोळे सोने चोरीला गेले.याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदरची घटना…
इचलकरंजीतून महाविकास आघाडी पाठिंबा देईल…
मागच्या वेळ झालेल्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला असून, सतत जनसंपर्क ठेवत नाराजी दूर करुन मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझा…
कबनूरला ४ एप्रिलपासून जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस! विविध स्पर्धांचे आयोजन
कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस समिती यांच्यावतीने उरसानिमित्त गुरुवारी (४ एप्रिल) सकाळी ८ वाजता लहान गट पळण्याच्या शर्यती,…