शुक्रवारी रेंदाळ येथे श्री अंबाबाई देवीची धार्मिक विधीने यात्रेची होणार सुरुवात

रेंदाळ येथील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या इंदुमती राणी सरकार शाहू कालीन श्री अंबाबाई देवीची यात्रेची लगबग सुरू झाली असून मंदिर रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाईनीमुळे परिसरात चैतन्यमय वातावरण पसरले आहे. शुक्रवार दि. १७ मे रोजी धार्मिक विधीने यात्रेची सुरुवात होणार असल्याची माहिती श्री अंबाबाई यात्रा कमिटीने दिली. या मंदिराचे जीर्णोद्धाराची सूरूवात कैअशोक हरी माळी यांनी केली असून गेली ३४ वर्ष झाली यात्रा भरते.

यावर्षीही धार्मिक विधीसह शुक्रवार दि. १७ मे रोजी सकाळी ६ वाजता अंबाबाई देवीला अभिषेक ७ वाजता देवीची ११ आरती, ८. ३० वाजता भव्यदिव्य असा पालखी सोहळा, वाजता मानाचा महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता अंबाबाई देवीचा गोंधळ, शनिवार दि. १८ मे रोजी रात्री ८ वाजता तानाजी कृष्णा पाटील (देवमामा ) यांचे शिष्य शुभम तानाजी पाटील (देवमामा) यांचा रेणुका देवीचा जागर यासह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी श्री अंबाबाई यात्रा कमिटी, ग्रामपंचायत रेंदाळ, हुपरी पोलीस ठाणे, महावितरण विभाग हुपरी, तरुण मंडळे, दानशुरांचे सहकार्य लाभत असून अमोल माळी, विलास ठोंबरे सर, मिलिंद कुंभार, बंडा मुरूमकर, नागेश खांडेकर, महेश गायकवाड, सचिन खोत, आनंदा नंदाळे, सचिन सुतार, संतोष ठोंबरे, विकास सुतार परिश्रम घेत आहेत.