इचलकरंजी, स्वच्छता पंधरवड्यादरम्यान “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार, ता. २५ सप्टेंबर रोजी शहरातील महासत्ता चौक, जुना चंदुर रोड, पंचवटी टॉकीज परिसर, नाईट कॉलेज परिसर, सी.ई.टी.पी. प्लांट ते बिग बाजार, शहापूर स्मशानभूमी ते सांगली नाका अशा ७ विविध ठिकाणी सकाळी ८ वाजले पासून “एक दिवस एक तास एक साथ ” स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जवळपास १७
टन कचरा जमा करण्यात आला.
नाईट कॉलेज, इंडस्ट्रीयल इस्टेट परिसर येथे कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे- कोल्हे, उपायुक्त विद्या कदम, सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सुनील शिंदे यांचे उपस्थित स्वच्छतेची शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छता अभियान राबवित असताना स्वच्छतेचे घोषवाक्य देत नागरिकांची स्वच्छतेबाबत जनजागृती करून लोकसहभागाने श्रमदान करण्यात आले. स्वच्छता अभियानात कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे, सहा. नगररचनाकार अविनाश बन्ने, सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर,मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, महिला बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ, सहा लेखा परीक्षक धनंजय पळसुले, उपलेखापाल रामचंद्र कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, महादेव मिसाळ, विधी अधिकारी अॅड. भावना देवडा, औषध निर्माण अधिकारी संभाजी पोवार, संदीप जोशी, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, दिपक खोत, सुनिल बेलेकर, बाळकृष्ण वनखंडे, यांचेसह या परिसरातील स्वच्छता निरीक्षक, मुकादम तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागाकडील अधिकारी कर्मचारी परिसरातील स्थानिक नागरिकांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक आदी सहभागी झाले होते.
