सध्या इचलकरंजी बस स्थानकामध्ये कॉक्रिटीकरण करण्याचे काम चालू आहे परंतु याचा नाहक त्रास प्रवाशांना करावा लागत आहे. अनेक मार्गावर जाणाऱ्या बस थांब्याची व्यवस्था दुसऱ्या भागात केली आहे. कर्नाटक कडे जाणाऱ्या बस थांब्याची व्यवस्था वाहतूक शाखेच्या मागील बाजूस केली आहे.
भर उन्हात बस स्थानकातील कॉक्रिटीकरणाच्या कामामुळे संतापाची लाट उमटली आहे. उन्हात उभे राहुन स्थानकाच्या एसटी बसची वाट पाहत आहेत. शहर वाहतूक शाखेच्या मागील बाजूस उघड्यावरच भर उन्हामध्ये प्रवासी बसची वाट पाहताना दिसत असून उन्हाच्या कडाक्याने महिला लहान मुले व वृद्ध प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांना निवाऱ्यासाठी तात्पुरते शेड उभे करावे, अशी मागणी होत असून बस स्थानकातील प्रशासनाच्या गलथान नियोजनाबाबत प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.