खुशखबर! नवी मुंबई महानगरपालिकेत ६२० पदांसाठी बंपर भरती; १३२००० रुपये पगार; कसा करायचा अर्ज जाणून घ्या

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर आणि इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालू आली आहे. कारण नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. या जाहिरातीनुसार गट’क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८.०३.२०२५ पासून ते दिनांक ११.०५.२०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ११.०५.२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

महापालिका भरती प्रक्रिया परीक्षा शुल्क –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये
  • मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – ९००

उपलब्ध पदे आणि पगार तपशील

भरती मोहिमेमध्ये स्पर्धात्मक पगार पॅकेजेससह विविध प्रकारच्या नोकरीच्या पदांचा समावेश आहे. काही प्रमुख भूमिकांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • बायोमेडिकल इंजिनिअर – पगार ४१,८०० ते १,३२,३०० रुपये दरम्यान
  • ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर, ज्युनिअर बायोमेडिकल इंजिनिअर, गार्डन सुपरवायझर, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – पगार ३८,६०० ते १,२८,००० रुपयांदरम्यान
  • दंत स्वच्छता तज्ञ – पगार ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांदरम्यान
  • स्टाफ नर्स, डायलिसिस टेक्निशियन, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ईसीजी स्पेशालिस्ट, सीएसएसडी टेक्निशियन, डाएट टेक्निशियन – पगार ५,४०० ते १,१२,४०० रुपयांदरम्यान
  • नेत्ररोग सहाय्यक – पगार ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांदरम्यान
  • आरोग्य सहाय्यक (महिला), फार्मासिस्ट – पगार २९,२०० ते ९२,३०० रुपयांदरम्यान
  • गार्डन असिस्टंट, अकाउंट्स क्लर्क, पोस्ट-मॉर्टेम असिस्टंट आणि इतर तत्सम पदांसाठी देखील रिक्त पदे आहेत.

परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. तसेच संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट द्या. तसेच पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाचत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.