या तारखेपर्यंत भरता येणार आरटीई प्रवेशासाठी अर्ज!

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अर्थात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क संदर्भात प्रवेशासाठी अर्ज भरण्यास शुक्रवार, १७ मे २०२४ पासून सुरुवात झाली आहे.ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची शेवटची मुदत ३१ मे २०२४ पर्यंत असणार आहे. दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग

बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रवेश आरटीई कायद्यानुसार देण्यात येणार आहेत.

आरटीई कायद्यानुसार सोलापूर शहर-जिल्ह्यात २ हजार ५३१ प्रवेश देण्यात येणार आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) अनुसार

सोलापूर शहर-जिल्ह्यातील शाळात आरटीईनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. यात २९६ शाळात स्वयंअर्थसाहित, विनाअनुदानित, पोलीस कल्याणकारी विनाअनुदीत शाळा आणि महानगरपालिका स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा समावेश आहे.