आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा बडगा उचलला असून शुक्रवारी वाळू वाहतूक
करणाऱ्या दोघांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.तहसील प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली असून तहसीलदार सागर ढवळे हे पथकात कारवाईमध्ये सहभागी होत आहेत. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात घरनिकीचे तलाठी संतोष पवार यांनी बाबूराव पुजारी (रा. पुजारवाडी) व दादा टोणे (रा. करगणी) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, शुक्रवारी रात्री ११ वाजता सोनारसिद्धनगर येथे पथक गस्तीवर असताना, एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना आढळला. यावेळी त्याला अडवून विचारले असता, त्याने ट्रॅक्टर दादा टोणे याचा असल्याचे सांगितले. पथकाने तो अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. त्या ट्रॅक्टरच्या मागे दुचाकी (क्र. एमएच १० ई ६२६३) होती. या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल आहे