मान्सूनचे वारे अंदमानात दाखल होणार…

भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून होऊ शकते. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाले आहेत.

गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता नियोजित गणितानुसार सर्वकाही पार पडल्यास 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.