यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 800 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2024 आहे. हे अर्ज दिलेल्या तारखेच्या ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहेत. त्यामुळे हा अर्ज कसा करायचा?? वयोमर्यादा काय आहे?? पात्रता काय हवी?? याविषयी जाणून घ्या.
ज्युनिअर असिस्टंट
महावितरणअंतर्गत जुनियर असिस्टंटची 468 पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराने बीकॉम/बीएमएस/ बीबीए केलेले असावे. यासह अर्ज करणाऱ्या उमेदवाराला एमएससीआयटी किंवा समकक्ष ज्ञान असायला हवे. निवड झालेल्या उमेदवाराला प्रथम वर्ष 19,000 हजार पगार दिला जाईल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 20 हजार आणि तिसऱ्या वर्षी 21 हजार पगार मिळेल. त्यामुळे वेळ न दवडता इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदासाठी अर्ज करावा.
ग्रॅज्युएट असिस्टंट
महावितरणाअंतर्गत (Mahavitaran Bharti) 51 रिक्त पदे ग्रॅज्युएट असिस्टंटची भरली जाणार आहेत. या पदाकरिता इच्छुक उमेदवाराने इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असायला हवा. निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला अठरा हजार रुपये पगार दिला जाईल.
ग्रॅज्युएट इंजिनीअर
महावितरणअंतर्गत (Mahavitaran Bharti) ग्रॅज्युएट इंजिनिअरची 281 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेमधून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगची पदवी. घेतली असावी. या रिक्त पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 22 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
लक्षात ठेवा की, या सर्व रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. या पदांविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर www.mahadiscom.in या वेबसाईटला भेट द्यावी. महत्वाचे म्हणजे दिलेल्या तारखेच्या पुढे अर्ज केल्यानंतर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.