नवेखेडला बेकायदा दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई…

नवेखेड (ता. वाळवा) येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम व देशी दारूच्या ३४ बाटल्या असा २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिस कर्मचारी सचिन अशोक यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित विष्णू पाटील ( वय ३२, रा. नवेखेड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित पाटील देशी दारूची अवैधरीत्या विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.