रितेशची मराठी ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री!

छोट्या पडद्यावर कायम चर्चेत असलेला बिग बॉस मराठी या रिएल्टी शोची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व असणार आहे. या सीझनचा होस्ट  महेश मांजरेकर यांच्याऐवजी  रितेश देशमुख असणार आहे. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये बिग बॉस मराठीच्या या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या आधीच्या पर्वातील बिग बॉसमधील स्पर्धक अपूर्वा नेमळेकरच्या कमेंटने लक्ष वेधले आहे. 

कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी ‘बिग बॉस मराठी’चे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठीच्या घोषणेनंतर बिग बॉस मराठीचे चाहते उत्सुक दिसले. तर, दुसरीकडे बिग बॉसमध्ये याआधीच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी शोचा नवा होस्ट रितेश देशमुखचे स्वागत करताना कमेंट्स केल्या आहेत.